केरळी कोंबडीचा रस्सा बनविण्याच्या कृतीचा हा व्हिडिओ आहे.
एक किलोग्रॅम कोंबडीचे मध्यम आकाराचे तुकडे करून ते बाजूला ठेवा.
3 ते 4 चमचे तेल घ्या आणि त्यात खालील पदार्थ परता:
- कांदे - 2.
- आलं - 2 इंच
- लसूण - 8-10 पाकळ्या
- हिरव्या मिरच्या - 2 किंवा 3
त्यानंतर खाली दिलेल्या मसाल्यांना दळून घ्या किंवा थोडे पाणी घालून एकत्र करून घ्या:
- धणे पूड - 2 ते 3 चमचे
- लाल तिखट - 1½ चमचा
- हळद - ½ चमचा
- गरम मसाला - 1½ ते 2 चमचे
मसाला भाजेपर्यंत आणि तेल वेगळे होईपर्यंत ढवळत रहा. नंतर त्यात कोंबडीचे तुकडे आणि एक किंवा दोन बटाटे, एक चिरलेला टॉमेटो आणि चवीनुसार मीठ घाला. मिश्रण चांगले एकत्र करा आणि त्यात दीड ग्लास पाणी घाला. झाकण ठेवून मांस मऊ होईपर्यंत शिजवा. त्यात खूप रस असल्यास, झाकण काढून मोठ्या आचेवर आणखी काही वेळ ठेवा. कढीपत्त्याच्या पानांनी सजवा.
पाककृती: श्रीमती.लेलु रॉय (संदर्भ: लोनली प्लॅनेट एन्ड रफ गाईड)
ईमेल: simonroy@hotmail.com
दूरध्वनी: +91 471 2215377