फिश मप्पास बनविण्याच्या कृतीचा हा व्हिडिओ आहे..
500 ते 800 ग्रॅम मांसल मासे स्वच्छ करून त्याचे तुकडे करून बाजूला ठेवा.
खालील पदार्थांमध्ये थोडे पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा:
- लाल तिखट - 1 ½ ते 2 चमचे
- धणे पूड - 1½ ते 2 चमचे
- हळद - ½ चमचा
4 ते 5 चमचे खोबरेल तेल गरम करा आणि त्यात एक चमचा मोहरी घाला. नंतर अर्धा चमचा मेथीचे दाणे घाला आणि त्याचबरोबर:
- कांदे - 2 (बारीक चिरलेले)
- आलं - 2 ते 3 इंच तुकडे करून
- लसूण - 8 ते 10 पाकळ्या चिरून
- हिरव्या मिरच्या - 4 ते 5 तुकडे करून
- थोडी कढीपत्त्याची पाने
कांदा पार पारदर्शक होईपर्यंत परता. नंतर मसाल्याची पेस्ट त्यात घाला अणि भाजल्याचा वास येईपर्यंत परता. दोन चिरलेले टॉमेटो घालून परता.
एक कप पाणी आणि चवीनुसार मीठ घालून पाणी उकळू द्या. पाणी उकळल्यावर माश्याचे तुकडे घाला. रस घट्ट होईपर्यंत झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा.
शेवटी, एक कप नारळाचे दूध घाला आणि ते गरम होताच आचेवरून खाली उतरवा..
पाककृती: श्रीमती.लेलु रॉय (संदर्भ: लोनली प्लॅनेट एन्ड रफ गाईड)
ईमेल: simonroy@hotmail.com
दूरध्वनी: +91 471 2215377