मटण स्ट्यु बनविणाची कृती हा व्हिडिओ दाखवतो.
अर्धा किलोग्रॅम मटण, मध्यम आकाराच्या तुकड्यांमध्ये कापून स्वच्छ करा आणि बाजूला ठेवा.
तीन ते चार चमचे तेलात खालील पदार्थ परता:
- मध्यम-आकाराचे कांदे - 2 (चिरलेले)
- आलं - 2 इंच
- लसूण - 8 ते 10 पाकळ्या
- हिरव्या मिरच्या - 2 ते 3 (तुकडे करून)
नंतर त्यात दालचिनीच्या दोन किंवा तीन काड्या; आठ ते दहा लवंगा; तीन किंवा चार वेलच्या, आणि एक चमचा काळी मिरी घाला. परतून घ्या.
आता त्यात चिरलेला टॉमेटो; एका मोठ्या बटाट्याचे तुकडे, एक किंवा दोन गाजरांचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घाला.
पुन्हा एकदा परतून घ्या. तुकडे केलेले मटण त्यात घाला आणि चांगले एकत्र करा. तीन किंवा चार कप दुसरे नारळाचे दूध घाला.
मांस मऊ होईपर्यंत झाकण ठेवून शिजवा. नंतर रस्सा घट्ट करण्यासाठी थंड पाण्यात दोन चमचे मक्याचे पीठ विरघळून त्यात घाला.
दोन ते तीन मिनिटे उकळू द्या. नंतर पहिले नारळाचे दूध त्यात मिसळा. गरम करा आणी आचेवरून खाली उतरवा.
चिरलेले छोटे कांदे तुपावर भाजून त्यांच्या साहाय्याने हा पदार्थ सजवा.
पाककृती: श्रीमती.लेलु रॉय (संदर्भ: लोनली प्लॅनेट एन्ड रफ गाईड)
ईमेल: simonroy@hotmail.com
दूरध्वनी: +91 471 2215377