सामग्री
- पिवळा बलक घट्ट होईपर्यंत उकडलेली अंडी- - 4
- कांदा (चिरलेला)– 1 कप
- हिरव्या मिरच्या तुकडे करून- 3
- टॉमेटो (चिरलेला) - 1 कप
- गरम मसाला- 1 चमचा
- धणे पूड- 1 चमचा
- जिरं - 1 चमचा
- लाल तिखट - 1 चमचा
- हळद - ½ चमचा
- आलं-लसूण पेस्ट- 1 चमचा
- कढीपत्त्याची पाने
- कोथिंबीर
- मीठ
- तेल
कृती
भांड्यात एक चमचा खोबरेल तेल तापवून घ्या. जिरं आणि आलं-लसूण पेस्ट घालून थोडा वेळ परता. त्यात, चिरलेले मोठे कांदे, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची पाने घाला. हे मिश्रण तपकिरी रंगाचे झाल्यावर टॉमेटो घाला आणि चांगले हलवा. आता धणे पूड, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घाला. चांगले हलवा. ह्यात, अर्धा कप पाणी घाला. हळूवारपणे ढवळा. आता मीठ घाला.
हे उकळू लागले की, प्रत्येक अंड चार किंवा सहा तुकड्यांमध्ये कापून भांड्यातल्या ह्या उकळत्या मिश्रणात टाका. अंड्याचा पिवळा भाग न तोडता ते चांगले एकत्र करा.
एग कुट्टु कोथिंबीर घालून सजवा आणि गरम गरम वाढा.