मॅरिनेशनसाठी (भिजविण्यासाठी) लागणारी सामग्री
- मटण - ½ किग्रॅम (मध्यम आकाराचे तुकडे करून)
- कोथिंबीर - 25 ग्रॅम
- पुदीन्याची पाने - 25 ग्रॅम
- कढीपत्त्याची पाने - 10 ग्रॅम
- हिरव्या मिरच्या - 5
- जिरं - 1 चमचा
- लसूण (बारीक तुकडे करून) - 2 चमचे
- आलं (बारीक तुकडे करून) - 2 चमचे
- हळद - ½ चमचा
- लिंबाचा रस - 1 चमचा
- खसखशीची पेस्ट - 1 चमचा
- दही - ½ कप
- धणे पूड - 2 चमचे
- बडिशेपेची पूड - ½ चमचा
बिर्यानी भातासाठी लागणारी सामग्री
- तूप - 3 चमचे
- दालचिनी - 5 to 6
- तमालपत्र - 1
- वेलची - 4 to 5
- कढीपत्त्याची पाने
- कांदा (चिरलेला) - 1 कप
- बिर्यानी तांदूळ - 250 ग्रॅम
- पाणी - ½ लि
मसाला बनविण्यासाठी लागणारी सामग्री
- तूप- 2 चमचे
- दालचिनी - 5
- तमालपत्र - 1
- लवंग - 4
- वेलची - 4
- जायफळ - 100 ग्रॅम
- टॉमेटो - 1
सजावटीसाठी लागणारी सामग्री
- कांदा (काप काढून) - 1 कप
- काजू - ¼ कप
- बेदाणे - ¼ कप
कृती
मटणाचे तुकडे मसाल्यात भिजवून ठेवून तुम्ही सुरुवात करू शकता. एका भांड्यात मटणाचे तुकडे घ्या आणि यात लसूण, लवंग, दालचिनी, बडिशोप, हिरव्या मिरच्या, हळ्द, खसखशीची पेस्ट, कापलेलें आलं, जायफळ, तमालपत्र, पुदीन्याची पाने, जिरं, वेलची, धणे पूड, लिंबाचा रस, कढीपत्त्याची पाने, दही आणि मीठ घाला. मिश्रण चांगले एकत्र करा आणि बाजूला ठेवून द्या.
आता एका भांड्यात एक चमचा तूप घेऊन ते तापवा. त्यात काजू घाला. ते तपकिरी रंगाचे झाल्यावर काढून घ्या. असेच बेदाण्यांसोबतही करा. आता तुम्ही मोठे कांदे, मीठ घालून चांगले परतू शकता. ही सामग्री एका बाजूला ठेवून द्या.
भांड्यात तीन चमचे तूप घेऊन तापवा. त्यात चिरलेले कांदे घालून ते हलवा. त्यात, टॉमेटो घालून चांगले परता. आता त्यात मसाल्यात भिजवलेले मटण घाला. पुरेसे पाणी घालून थोडेसे ढवळा. भांड्यावर झाकण ठेवून शिजू द्या.
दुसरे भांडे घेऊन त्यात चार चमचे तूप गरम करा. त्यात लवंग, बडिशोप, दालचिनी, जिरे पूड आणि कढीपत्त्याची पाने घाला. त्यात, वेलची आणि कांदे घाला. चांगले परता आणि तांदूळ घाला. पुन्हा परता. तांदूळ बुडतील एवढे पाणी घाला. आता मीठ घाला. भांड्यावर झाकण ठेवून शिजू द्या.
आता मटण शिजत असलेल्या भांड्याचे झाकण काढा. थोडे ढवळा.
ज्या भांड्यात भात बनविला जात आहे त्या भांड्यातून थोडा शिजलेला भात छोट्या भांड्यात काढा. थोडे मटणाचे तुकडे घ्या आणि भांड्यात शिल्लक राहिलेल्या भातावर ठेवा. ह्या मटणाच्या तुकड्यांवर छोट्या भांड्यात काढलेला शिजलेला भात घाला. पुन्हा त्यावर उरलेले मटणाचे तुकडे पसरवा. शेवटी काजू, बेदाणे आणि परतलेले कांदे घाला. थोडी कोथिंबीर घालून एक मिनिटभर शिजू द्या.
आता केरळच्या मलाबार प्रदेशातली ही प्रसिद्ध मेजवानी वाढण्यासाठी तयार रहा.