Trade Media
     

अडा प्रथमन्

 
 
हे एक प्रकारचे पायसम (गोड पदार्थ) आहे. अडा म्हणजे तांदुळाच्या कणांपासून बनलेली लापशी आणि प्रथमन म्हणजे गोड नारळाचे दूध ज्यात ती घातली जाते.

प्रथमन म्हणजे पहिले. म्हणूनच अडा प्रथमन् हे नाव पडले कारण हे पहिल्या क्रमांकाचे पायसम आहे. हल्ली, घरगुती पिज़्झामध्ये बेस मात्र घरगुती नसतो. तसंच, प्रथमन घरी बनवले जाते तेव्हा तांदुळाचा रवा मात्र आणला जातो. मात्र, घरगुती अडा अगदी नरम असतो आणि त्यामुळेच प्रथमन बनविण्याचे फळ अगदी छान मिळते.

सामग्री
  • कच्चा तांदूळ - 1 कप
  • साखर - 1 कप
  • नारळ - 2
  • गूळ - ½ किलो 

सजावटीसाठी
  • काजू - ¼ कप
  • बेदाणे - ¼ कप
  • वेलची - 6
  • तूप - तळण्यासाठी 

कृती
अडासाठी रवा बनवणे

तांदूळ एक तास भिजवा, निथळून घ्या आणि कापडावर दोन तासासाठी वाळत घाला.

त्यानंतर त्याची बारीक पावडर बनवून बारीक चाळणीने चाळून घ्या.

आता 2 चमचे वितळलेले तूप घ्या, 2 चमचे साखर आणि कोमट पाणी घालून कणकेप्रमाणे किंवा नानकटाईच्या मिश्रणाप्रमाणे मळा.

अडा बनविणे
केळीचे पान घ्या आणि त्याचे साधारण 6 चौकोन करा. त्यांना आचेवर काही सेकंद धरून त्यांना लवचिक करून घ्या.

मोठ्या भांड्यात बरेच पाणी उकळवा. भिजवलेल्या पिठाचा लिंबाएवढा गोळा घ्या आणि केळीच्या पानाच्या मागच्या बाजूस थापा. आणि ताबडतोब उकळत्या पाण्यात सोडा. सगळे पीठ संपेपर्यंत करा. अडा शिजल्यावर तरंगू लागतील.

अन्यथा तुम्ही त्यांना 3-4 एकावेळी घेऊन स्टीमरमध्ये उकडवू शकता. अडा काढून त्यातले पाणी काढा आणि अडा बाहेर काढून बऱ्याच पाण्यात धुवा; पाणी तीन किंवा चार वेळा बदलून सगळा चिकटपणा काढून टाका. बारीक कापून घ्या..

अडा प्रथमन् बनविणे
नारळ खोवून पहिले दूध ¼ कप बाजूला ठेवा, 1 1/2 कप दुसरे दूध आणि 2 कप तिसरे दूध तयार ठेवा.

भांडे तापवा आणि ¼ कप तूप घालून शिजवलेले अडा परतून घ्या.तिसरे दूध, गूळ आणि साखर घालून मध्यम आचेवर 10 मिनिटांसाठी उकळवा.  

दुसरे दूध घाला आणि 5 मिनिटे उकळवा. पहिले दूध घाला आणि स्टोव्हवरून काढा, आणि चांगले ढवळत रहा. 1 चमचा वेलची पावडर घाला आणि चांगले मिसळा. तळलेले काजू आणि बेदाणे घाला.

आता जर तुम्ही स्वयंपाकात नवीन असाल तर तुम्हाला प्रश्न पडेल की हे पहिले दूध, दुसरे दूध, तिसरे दूध म्हणजे काय? अगदी सोपे आहे, खरंच. नारळ आणि पाणी मिक्सरमध्ये घालून पहिल्यांदा फिरवल्यावर गाळून काढलेले दूध म्हणजे दूध. यात तुम्ही जास्त पाणी घालता कामा नये. मग पहिल्यांदा चाळणीतून काढलेला नारळ पुन्हा मिक्सरला लावून जास्त पाणी घालून दुसरे दूध काढले जाते, आणि ते बाजूला ठेवून मग तिसरे दूध काढले जाते.

श्रीमती. लीला वेणू कुमार यांची पाककृती
दूरध्वनी: +919895534383
ईमेल: devoo_07@yahoo.co.in


 
 
 
Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia