हा व्हिडिओ पप्पडम थोरण कसा बनवायचा ते दाखवेल.
पप्पडम - तामिळनाडूमध्ये अप्पलम, हिंदी भागात पापड – म्हणजे वर्षानुवर्षे चालत आलेला उडदाचा पापड. पूर्वी अगदी पूर्णपणे घरी बनविले जाणारे हे पापड आता मात्र जवळच्या कोणत्याही किराणा दुकानात मिळून जातात.
साधारणपणे, पप्पडम तळले किंवा भाजले जातात. नवीन प्रयोग करणारे कुक – प्रयोगशील कुक, यांनी पप्पडम थोरण तसेच पुढे येणाऱ्या पप्पडम ओझीचुकरीसारखे पदार्थ बनवले ज्यात पप्पडम हा मुख्य घटक आहे.
पण तुम्ही जर मल्याळी आहात, आणि तुमच्या फ्रिजमध्ये देखील काही नाही तर यांचा प्रयोग तुमच्या आजी-आजोबांवर करू नका!
तर...तुम्हाला लागतील, 15 पप्पडम, एक कप खोवलेला नारळ, चार हिरव्या मिरच्या, चार लहान कांदे, दोन सुक्या लाल मिरच्या, अर्धा चमचा मोहरी, ¼ कप खोबरेल तेल, कढीपत्ता आणि मीठ.
सामग्री
- पप्पडम - 15
- नारळ (खोवलेला) - 1 कप
- हिरव्या मिरच्या - 4
- लाल मिरच्या - 2
- लहान कांदे - 4 (फोडणीसाठी बारीक चिरलेला)
- खोबरेल तेल - ¼ कप
- मोहरी - ½ चमचा
- कढीपत्ता
- मीठ
कृती
खोवलेला नारळ आणि हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि लहान कांदे एका बाउलमध्ये एकत्र करा.
पप्पडम हलके तळा – नेहमीसारखेच – आणि मग त्यांचा चुरा करा.
आता मीठ आणि नारळाचे मिश्रण घाला आणि मिसळा.
फोडणीत मोहरी तडतडू द्या आणि लाल मिरच्या, कापलेले बारीक कांदे आणि कढीपत्ता घालून परता.
पप्पडम-नारळाचे मिश्रण त्यात घाला आणि चांगले मिसळा.
आच कमी करा आणि शिजवल्यावर बंद करा.
श्रीमती. लीला वेणू कुमार यांची पाककृती
Tel: + 919895534383
ईमेल : devoo_07@yahoo.co.in