परिप्पू किंवा डाळ, ही परिप्पू आमटीचेच लहान नाव आहे, आणि डाळ हा भारतीय जेवणातला महत्त्वाचा भाग आहे. भारतात, तुम्ही कोणत्याही वर्गातले असलात तरी, तुमच्या आठवड्याभराच्या जेवणात डाळ नक्कीच असेल. ही बनवायला खूप सोपी असते आणि पांढरा भात, ब्राउन राईस आणि पोळ्यांबरोबर खाल्ले जाते.
आता डाळीचा केरळी नारळयुक्त प्रकार बनवुया.
सामग्री
- 1/2 कप मूगडाळ
- 1 कप खोवलेला नारळ
- 3 लसणीच्या पाकळ्या
- 3 चमचा खोबरेल तेल
- 2 चमचा तूप
- ½ चमचा जिरे
- ¼ चमचा हळद
- कढीपत्ता
कृती
जाड बुडाच्या कढईत तूप गरम करा. आता मूगडाळ तांबुस रंगाची होईपर्यंत भाजा.
एका भांड्यात 2 कप पाणी उकळवा. त्यात, भाजलेली मूगडाळ घाला आणि शिजवा, जोपर्यंत चांगली शिजत नाही. डाळ घट्ट झाली तर पाणी घालून थोडी पातळ करा. शिजलेली डाळ चांगली घोटा आणि मीठ आणि हळद घाला.
चांगली मिसळा. खोवलेले खोबरे, जिरे आणि लसणीबरोबर वाटा. वाटलेले मिश्रण डाळीत घाला व पाणी घालून मिसळा.
आचेवर चढवून काही मिनिटे उकळू द्या जोपर्यंत डाळ एकजीव होत नाही. हे झाले की, डाळ आचेवरून काढा आणि खोबरेल तेल आणि कढीपत्ता घाला. चांगले मिसळा.
श्रीमती. लीला वेणू कुमार यांची पाककृती
दूरध्वनी: +919895534383
ईमेल: devoo_07@yahoo.co.in