हा व्हिडिओ एरिशेरी ही केरळची प्रसिद्ध भाजी कशी बनवायची ते सांगतो.
सामग्री
- पिकलेला भोपळा (तुकडे करून) - 1 कप
- केळे (तुकडे करून) - 1 कप
- सुरण (तुकडे करून) - 1 कप
- लाल चवळी – 1 कप (शिजवलेली)
- हळद - 1 चमचा
- जिरे - 1 चमचा
- लसूण - 2 पाकळ्या
- हिरव्या मिरच्या - 3
- मिरं - 1 चमचा
- कढीपत्ता
- नारळ (खोवलेला) - 1 cup
फोडणीची सामग्री
- मोहरी - 1 चमचा
- उडीद डाळ - 1 चमचा
- लाल मिरच्या - 4
- कढीपत्ता
- मीठ
- तेल
कृती
एका प्रेशर कुकरमध्ये लाल चवळी घाला. आता सुरणाचे, केळ्याचे आणि भोपळ्याचे तुकडे घाला. चांगले ढवळा. पाणी घाला आणि शिजवा.
प्रेशर कुकरचे झाकण उघडा आणि खोवलेला नारळ, हळद, जिरे, लसूण, हिरव्या मिरच्या आणि मिरे वाटून घाला. चांगले ठवळा. मीठ आणि थोडे पाणी घाला.
फोडणीसाठी, कढई घ्या आणि थोडे तेल गरम करा. त्यात लाल मिरच्या, मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता आणि खोवलेला नारळ घाला आणि चांगले मिसळा.
प्रेशर कुकरमधून सगळे बाऊलमध्ये काढा. आता तुम्ही फोडणी बाउलवर घालू शकता.
आता वाट कसली पाहताय? तुमची एरिशेरी तयार.