केरळी लोकांचे सोन्याचे प्रेम हे त्यांच्या प्राण्यांच्या सजावटीतूनही दिसून येते. येथील प्रत्येक उत्सवाचा महत्त्वाचा भाग असलेल्या हत्तीला कोणत्याही उत्सव किंवा मिरवणुकीसाठी भव्य रूपात सजवले जाते. नेट्टिपट्टम् (हत्तीच्या मस्तकावरील चमकदार झूल) ही कुशल कामगारांद्वारे सोन्यात बनवली जाते. भारतात कोठेही हत्तीची सजावट इतक्या भव्यतेने केली जात नाही.
नेट्टिपट्टम् कसे बनते: साडेतीन किलो तांबे आणि 24 ग्रॅम सोने यापासून साधे नेट्टिपट्टम् बनते. हा दागिना बनण्यासाठी कमीतकमी 20 दिवस लागतात. नेट्टिपट्टम् चा आकार हत्तीच्या आकारानुसार वेगवेगळा असत्प. 9-10 फूट उंचीच्या हत्तीला 60 ते 66 इंचाचा नेट्टिपट्टम लागेल ज्याला कमीतकमी 11 चंद्रकला लावलेल्या असतील.
हे येथे उपलब्ध आहे – कल्चरल शॉपी दुकान, मॅस्कॉट हॉटेल, थिरुवनंतपुरम - 695 033, केरळ. ईमेल: info@cultureshoppe.com,
www.cultureshoppe.com. या कल्चरल शॉपी केरळ सरकारच्या पर्यटन विभागाच्या केरळ स्मृतिचिन्हांचा प्रसार करणाऱ्या अधिकृत एजन्सी आहेत.