 |
 |
|
 |
 |
 |
|
 |
 |
|
| केळ्याचे वेफर्स |
|
 |

वेफर्स हा जगभरातील सर्व वयोगटांतील माणसांचा आवडता उपाहार आहे. प्रिंगल्सचे बटाट्याचे वेफर्स, बाह्ल-सेन चे विविध चवींचे वेफर्स किंवा विविध प्रकारच्या फ्रेंच फ्राईजशी सगळेच परिचित आहेत. आणि एकदा वेफर्स खायला सुरुवात केल्यावर कोणीही स्वत:ला थांबवू शकत नाही, ही वस्तुस्थितीदेखील सगळेच मान्य करतील.
केरळची ही अनोखी पाककृती तुम्हाला विविध प्रकारच्या, कृत्रिम रंग अथवा चव न वापरलेल्या, नैसर्गिक वेफर्सची चव चाखवेल. अम्ही कच्ची केळी, बटाटे, फणस, अळकुड्या इ. पासून वेफर्स तयार करतो. हे वेफर्स तयार करणारी माणसे तुम्हाला राज्यभर भेटतील. हे अतिशय कुरकुरीत, चटकदार, पातळ व तळलेले वेफर्स घराघरांमधे केले जातात. त्यात केळ्याचे वेफर्स जास्त लोकप्रिय आहेत.
याची किंमत तळण्यासाठी वापरले जाणारे तेल (सामान्यत: खोबरेल तेल), केळी, फणस, अळकुड्या, बटाटे इ. च्या किंमतीवर ठरते.
|
|
|
| |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| |
|
|