 |
 |
|
 |
 |
 |
|
 |
 |
|
| हत्तीची प्रतिकृती |
|
 |

आपण जेव्हा जेव्हा आमच्या सणांबाबत जाणाल तेव्हा तेव्हा तुम्हाला ’सुसज्जित हत्ती’. ’रंगीत छत्री’ इत्यादी शब्दांशी अधिक परिचय होत जाईल.केरळम्ध्ये हत्ती हा लोकांच्या जीवनातील एक अभिन्न घटक असतो आणि जवळपास प्रत्येक घरात एक हत्ती दिसून येतो. तुम्ही याला प्रतिकृतीच्या रुपातदेखील आपल्या घरी आणू शकता. आमचे कारागीर काकडे, दगड यांवर हत्तीची चित्रे कोरून त्यांना छोटे आरसे, मोती लावून तसेच कशिदाकारी करून सजविण्यामध्ये पारंगत आहेत, ज्यामुळे आपल्याला ह्या कलाकृती खर्या जिवंत सुसज्जित हत्तीप्रमाणे दिसून येतील.
केरळ आपल्या नक्षीदार काम, बेलमेट्लचे साचे बनविण्याचे काम, आभूषणे बनविणे, ग्रॅनाइट्च्या मूर्त्या बनविणे, पिलर, नारळाच्या शेंड्या, खोबर्याच्या वाट्या तसेच चोथ्यापासून बनणार्या कलात्मक वस्तू, लाकडाच्या नक्षीदार वस्तू (खासकरून शिसवी किंवा चंदनाच्या लाकडावर), स्नेक बोटीची प्रतिकृती तसेच अन्य छोट्या छोट्या कलात्मक वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक कलात्मक वस्तू आपल्या विशिष्ठ क्षेत्राशी संबधित आहे. तिरुवनंतपुरमचे कारागीर हे शिसवी लाकडाच्या हत्तीचे नमुने तय्यर करतात,त्याचप्रमाणे हे शंख आणि शिंपल्यांचे पेपरवेट आणि लॅंप सारख्या वस्तूंची देखील निर्मिती करतात.हत्तींना सजविण्याच्या तसेच अलंकृत करणार्या वस्तू तसेच काही सणांच्या वेळी वापरल्या जाणार्या साज-शृंगाराच्या वस्तूंची निर्मिती एर्नाकुलम मधील तिरुवन्कुलममध्ये आणि त्रिशूरच्या जवळपासच्या क्षेत्रांमध्ये केली जाते.
|
|
|
| |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| |
|
|