 |
 |
|
 |
 |
 |
|
 |
 |
|
| वेलची |
|
 |

“...सौम्य चवीचे खाणार्यांना केरळचे पदार्थ खूप मसालेदार वाटू शकतात...".असा इशारा काही टूरिस्ट गाईड मसाल्यांच्या ह्या प्रदेशाला भेट देणार्या पर्यटकांना देतात..
केरळमधील मसाल्यांचा व्यापार 7500 वर्षांपूर्वीपासून चालत आलेला आहे. मालाबारमधल्या मसाल्याच्या किनारपट्टीचा उल्लेख प्राचीन प्रवासवर्णनांमध्ये आढळतो. आणि जर मिरची आणि मिरी कायमचे आवडते मसाल्याचे पदार्थ राहिले असतील, तर मालाबारची वेलची जगातली सगळ्यात श्रेष्ठ मानली जाते. वास्तवात आज पश्चिमेकडच्या देशांमध्ये औषधी म्हणून केवळ केरळमधील वेलची वापरली जाते.
वेलचीमध्ये, तिच्या औषधी गुणांव्यतिरिक्त, एक आकर्षक स्वाद आणि सुगंध असतो, जो तिला चहा, शीतपेये, मिठाई आणि मोरांबे, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांमधला एक महत्वपूर्ण घटक बनवितो. समुद्राच्या पातळीपासून 750-1000 मी उंचावर असलेल्या जंगलांनी व्यापलेल्या पश्चिमी घाटांमध्ये वेलची मुख्यत: आढळून येते. (वेलचेची मूळ स्थान आहे.) इडुक्की जिल्ह्यातला डोंगराळ भाग, जो मसाल्यांचा मुख्य उत्पादक आहे, कार्डममम हिल्स (वेलचीचे डोंगर) या नावाने ओळखला जातो.
वेलचीचे उत्पन्न करणारा भारत हा जगातला सगळ्यात मोठा देश आहे आणि केरळचा त्यात सिंहाचा वाटा आहे. ह्या राज्यात (आणि देशात) सर्वसाधारणपणे वापरली जाणारी वेलची सगळ्या किराणामालाच्या दुकानांमध्ये, सुपर मार्केटमध्ये आणि देशातल्या सरकारी एम्पोरिअममध्ये मिळते. याची प्रमाणभूत किंमत किलोमागे 500 ते 600 रुपये असली तरी गुणवत्तेच्या आधारे ती बदलू शकते.
|
|
|
| |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| |
|
|