 |
 |
|
 |
 |
 |
|
 |
 |
|
| नारळाच्या काथ्यापासून बनविलेली उत्पादने |
|
 |

साधी आणि सुरेख, सुंदररीत्या हस्तशिल्पित केलेली केरळमधील नारळाच्या काथ्यापासून बनविलेली उत्पादने कोणत्याही घराला किंवा कार्यालयाला कलात्मक रूप प्रदान करतात. नारळाच्या या भूमीतल्या नारळाच्या शेंडीवाल्या गावांमधल्या महिलांनी बनविलेल्या नाविन्यपूर्ण वस्तूंच्या यादीत चटया, लहान गालिचे, भित्तिचित्रे, डोअर पीसेस, पिशव्या, झुले, सीलिंग/फ्लोअर फर्निशिंग, बिछाने, उश्या, छोटे शोपीस, पडदे... ह्यांचा समावेश आहे.
नारळाच्या सालीपासून बनविलेले, कॉयर क्राफ्ट, एक दीर्घकालीन क्रिया आहे. सर्वप्रथम मोठ्या प्रमाणात नारळाच्या साली ह्या गावांच्या आसपासच्या बॅकवॉटरमध्ये त्यांचा र्हास होण्यासाठी ठेवून दिल्या जातात. ह्यांच्या मौउ भागाचा र्हास हो ऊन केवळ तंतु शिल्लक राहिले की, ते गोळा केले जातात आणि देशी यंत्रांवर त्यांचे दोरखंड विणले जातात. त्यानंतर ते सुकवले जातात आणि खूप बारकाईने हस्तकलेच्या वस्तू बनविल्या जातात.
बहुतांश कॉयर उद्योग कोल्लम आणि अल्लपुझा जिल्ह्यांमध्ये केंद्रित आहे. ह्या उद्योगात चार लाखांहून अधिक लोक सहभागई आहेत, ज्यामध्ये 84 टक्के महिला आहेत; केरळमधील एक पारंपरिक उद्योग जो आजही अबाधित आहे.
नारळाच्या काथ्यापासून बनविलेली ही उत्पादने तुम्ही देशभरातल्या केरळ स्टेट को-ऑपरेटिव्ह कॉयर मार्केटिंग फेडरेशन(कॉयरफेड) मधून खरेदी करू शकता. इंटरनेटवरील कॉयरफेडचे संकेतस्थळ http://www.coirfed.com यावर तुम्हाला डिझाईन निवडण्याची किंवा त्यात योगदान देण्याची आणि उत्पादन मागविण्याची सुविधा मिळते. पर्यावरणाला अनुकुल असलेली उत्पादने तुम्हाला जहाजाने उत्पादन मागविण्याच्या तारखेपासून काही दिवसांमध्ये पाठविली जातील. ह्यांची किंमत शंभर रुपयांपेक्षा कमी ते काही हजार रुपयांपर्यत असते, जी मागविलेल्या उत्पादनाची वीण आणि आकार यावर अवलंबून रहाते.
|
|
|
| |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| |
|
|