 |
 |
|
 |
 |
 |
|
 |
 |
|
| तंतु शिल्प |
|
 |

पिसाइतक्या हलक्या बाहुल्या, चटया, पर्स, पिशव्या, बांगड्या, भित्तिचित्रे, कपड्यांचे भागसुद्धा... हस्तनिर्मित तंतु शिल्प वस्तुंची यादी न संपणारी आहे आणि ती शिल्पकाराच्या सर्जनशीलतेवर अवलंबून असते. कुटीर उद्योगाच्या उत्पादनाच्या रूपात, ह्या वस्तू राज्यातल्या अनेक गावांमधून तयार होत शहरात पोचतात.
साधारणपणे पांढरे किंवा फिकट पिवळ्या रंगाचे असणारे हे तंतु, केळी (खोड), अननस (पाने) इत्यादी वनस्पतींपासून मिळविले जातात. तंतुचा मऊ आणि रेशमी पोत उत्पादनाला चकाकदार बनविते. हे तंतू गुंडाळले जातात, उन्हात तापविले जातात आणि मग ह्या अनेक हस्तकला वस्तूंमध्ये वापरण्याआधी रंगविले जातात.
तंतु शिल्प वस्तु फॅन्सी दुकानांमध्ये, थिरुवनंतपुरम येथील राज्य सरकारी हस्तकला एम्पोरिअम-एसएमएसएम संस्थेत उपलब्ध आहेत आणि विविध पर्यटन स्थळांवर फेरीवाल्यांमार्फतही त्या विकल्या जातात.
ह्या वस्तु खूप महाग नसतात आणि काळजीपूर्वक वापरल्यास आणि धूळीपासून दूर ठेवल्यास आयुष्यभर टिकतात.
|
|
|
| |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| |
|
|