 |
 |
|
 |
 |
 |
|
 |
 |
|
| सुवर्णालंकार |
|
 |

सुवर्णालंकारांच्या बाबतीतले केरळी लोकांचे प्रेम हे फार प्राचीन काळापासूनच दिसून येते. अगदी त्या काळातही प्रत्येक जातीचे अथवा समुदायाचे त्यांचे असे विशिष्ट नक्षीचे दागिने खास कुटुंबाच्या सोनाराकडून घडवले जात असत. पण आता आधुनिक काळात अगदी नव्या पद्धती दिसून येतात. फॅशन क्षेत्राच्या विकासामुळेच पारंपरिक व आधुनिक प्रकारच्या नक्ष्या दागिन्यांच्या दुकानत एकाच छताखाली दिसण्याचा चमत्कार घडून आला आहे.
जात किंवा धर्माच्या पलिकडे जाऊनही केरळामधे अनेक स्त्रिया सुवर्णालंकार वापरतात. हे अलंकार विवाहासारख्या धार्मिक विधींमधे महत्त्वाचे स्थान भूषवतात. थालिकेट्टू हा केरळी विवाहामधील एक प्रमुख विधी आहे. यात पवित्र विवाहसूत्र बांधणे हा प्रमुख कार्यक्रम असून या सूत्रामधे एक ‘थाली- पानाच्या आकाराची एक सोन्याची प्लेट’ गुंफलेली असते. ही थाली पवित्र विवाहबंधन सूचीत करते. ख्रिस्ती धर्मियांमधे या थालीत एक छोटा क्रॉस गुंफलेला असतो.
कानाच्या वरच्या भागात घातला जाणारा मोठा छल्ला हा ख्रिस्ती स्त्रियांच्या सुवर्णालंकारांमधील अतिशय खास दागिना मानला जातो. मुस्लिम स्त्रियांचे देखील त्यांचे विशिष्ट असे- कर्णफुले, हार, तसेच मोठ्या प्रमाणावर नक्षीकाम केलेले कमरेत(ओडियनम) घालयचे दगिने असे अनेक अलंकार असतात.
राज्याच्या जवळजवळ सर्व भागात सुवर्णालंकार बनवले जातात. मध्य केरळातील त्रिसूर हे तर पारंपरिक सुवर्णालंकारांच्या खरेदीच्या बाबतीत कायमच स्वर्ग मानले जाते. त्रिसूरमधील ज्वेल स्ट्रीट हा तर एकाच गल्लीमधे जास्तीत जास्त दागिन्यांची दुकाने असण्याबद्दल प्रसिद्ध आहे.
लोकप्रिय पारंपरिक दागिन्यांमधे पय्यानूर, पवित्र मोतिरम(अंगठी), सुवर्णहारांमधे मननमणी, इलकथ्थली, पुथली, पलयक्कमाला मंगमाला, दलामिनि, चुट्टीयम चेलुम, पुलियामोथिरम, कर्णफुलांमधे जिमिक्की, कन्नुनिरथुली, तोडा इ. कप्पूसारख्या बांगड्या, खडे, मोती, एनेमेल ने रंगवलेली ब्रेसलेट्स चा समावेश होतो.
वेषभूषेच्या आतून कमरेभोवती घालयच्या अलंकारास- जी सामान्यत: एक बारीकशी साखळी असते-अरंजनम म्हणतात. मात्र मुस्लिम स्त्रियांमधे वेषभूषेच्यावरून वापरल्या जाणाऱ्या पट्ट्यासारख्या अलंकारास ‘ओडियनम’ म्हणतात. हे ओडियनम सामान्यत: मोठे व बारीक नक्षीचे असे असतात.
|
|
|
| |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| |
|
|