 |
 |
|
 |
 |
 |
|
 |
 |
|
| तृण कला |
|
 |

बॅकवॉटर आणि सायंकाळचे आकाश, वल्ल्मकली (नौकांची शर्यत), गावांमधल्या जत्रा आणि उत्सव, झोपड्या आणि लहान खेडी, डोंगर आणि दर्या...केरळमधील ही सगळी मंत्रमुग्ध करणारी दृश्य तृण कलेत साकारून ती जिवंत केली जातात. वेगवेगळ्या आकारांच्या गवताच्या काड्या कापून त्या कपड्यावर किंवा कॅनव्हासवर चिकटवून चित्र तयार करण्याची ही विशिष्ट हस्तकला वैक्कोल चित्रंगल (तृण चित्र) म्हणून ओळखली जाते.
एक प्रसिद्ध कुटिर उद्योग, तृण चित्रांना ओणम, ख्रिसमस, नवीन वर्ष इत्यादी सणांदरम्यान शुभेच्छा पत्रांच्या रूपात चांगली बाजारपेठ मिळते. बाजारातल्या अन्य शुभेच्छा पत्रांच्या तुलनेत ही शुभेच्छा पत्र स्वस्त असतात.
वेक्कोल (तृण) कारागीर बहुतांश गावकरी असतात. त्यामुळे गावकर्याचा साधेपणा, त्याचे विचार आणि सौंदर्यदृष्टी ह्या चित्रांमध्ये प्रतिबिंबित झालेली असते. दोन बाजू असलेली मोठी भित्तिचित्रेही उपलब्ध असतात. ह्या सुंदर कलाकृती, सुरेख आणि नाविन्यपूर्ण तृण चित्रे, राज्यभरातल्या हस्तकला एम्पोरिअममध्ये वर्षभर उपलब्ध असतात.
|
|
|
| |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| |
|
|