
कसावू मुंडू आणि नेर्याथू ही अतिशय हलकी शुद्ध सुती हातमागाची सोनेरी काठ असलेली वस्त्रे असतात. कधीकधी सोनेरी काठाला विरोधी चमकदार रंगाचीही जोड दिलेली असते. पारंपरिक साडी म्हणून किंवा ड्रेसचे कापड म्हणून त्यांचा वापर होतो.
मुंडू आणि नेर्याथू नेसलेली तेल लावलेले लांब केसे हलकेच जुईच्या गजऱ्याने बांधलेली मल्याळी (केरळी) स्त्री फारच सुंदर दिसते. कपाळावर टिकली आणि डोळ्यात काजळ आणि तिचे आवडते सोन्याचे दागिने हे सोडून ती कोणताही मेक-अप करत नाही. हे दृश्य या भूमीतले आहे आणि हे अतिशय नैसर्गिक तरीही आकर्षक असते. पुरूष कमरेला मुंडू बांधतात आणि नेर्याथू खांद्यावर टाकतात.
|