 |
 |
|
 |
 |
 |
|
 |
 |
|
| कथकली शो-पीसेस |
|
 |

केरळच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे हे कथकली शो-पीसेस किंवा मुखवटे लहान स्वरुपात देखील उपलब्ध आहेत. कथकलीच्या वेषभूषेमधे समाविष्ट असणारी मोठी शिरोभूषणे, रंगवलेला चेहरा व लांब काळे केस या सर्व गोष्टी प्लॅस्टर ऑफ पॅरिस, चिकणमाती, किंवा कागदाच्या लगद्यापासून तयार केल्या जातात.
चेहऱ्यावरील रंग, शिरोभूषणे व दाढीचा आकार यांनुसार कथकलीमधे पात्रांचे पाच वेगवेगळे प्रकार असतात. पाचा अथवा हिरवी वेषभूषा धार्मिक व कुलीन घराणे दर्शवते. कथि किंवा चाकू गर्व, आक्रमकपणा,दुराचार दर्शवतो, लाल थडी अथवा दाढी आक्रमक व राक्षसी वृत्तीचे प्रतिक असून, पांढरी थडी अथवा दाढी देवता इ. पौराणिक व सत्शील रुपे दर्शवतात. काळी थडी अथवा दाढी हे टोळीतील किंवा जंगलात अथवा गुहांमधे राहणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करते. मिनिक्कू अथवा पॉलिश्ड रुपे ही स्त्रिया, संत, ब्राह्मण यांचे प्रतिनिधित्व करतात. केरळी लोक सामान्यत: पाचा अथवा चांगली रुपे घरी लावणे पसंत करतात.
विविध रंगांचा समावेश असणारी ही मौल्यवान कलाकृती अर्थिक दृष्ट्या एक फायदेशीर ग्रामीण-लघुउद्योग बनून गेला आहे. एका मुखवट्याची किंमत ही त्याचा आकार, त्यासाठी वापरले गेलेले सामग्री, व त्यावरील नक्षीयानुसार शंभरपेक्षा कमी किंवा काही शे रुपये देखील असू शकते. कथकली मुखवटा हा राज्यसरकारच्या मालकीच्या विक्री-केंद्रांमधे तसेच प्रसिद्ध मंदीरे व पर्यटनस्थळांजवळील अनेक हस्तकला-केंद्रांमधे उपलब्ध आहेत.
|
|
|
| |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| |
|
|