केरळमध्ये राजस्थानच्या खालोखाल पुराणावर आधारित भित्तिचित्रांचा साठा आहे. केरळमधील भित्तिचित्रे रचनात्मक आणि तांत्रिक सौंदर्यात वेगळी आहेत. यातील बहुतेक 15 ते 19 व्या शतकात साकारली आहेत आणि काही तर 8व्या शतकातली आहेत.
केरळची मंदिरे आणि महाल हिंदू देव देवतांची चरित्रे कथन करतात आणि त्यांच्या विक्रमांची ती दृश्यकाव्ये आहेत. हे दृश्य चमत्कार घडविण्यासाठी, पुष्कळ निष्ठा आणि भक्ती लागली. रंग, गोंद, ब्रश सारे काही वनस्पती आणि नैसर्गिक क्षारांपासून बनलेले होते. केरळमध्ये अधिककरून वापरले जाणारे रंग म्हणजे केशरी-लाल, केशरी पिवळा, हिरवा, लाल, पांढरा, निळा, काळा, पिवला आणि सोनेरी पिवळा.
तुम्ही जर या कलेचे एक विद्यार्थी असाल, तर केरळमधील या ठिकाणांना तुम्ही निश्चित भेटी दिल्या पाहिजेत.
केरळमधील सर्वात जुने भित्तिचित्र तिरुनंदिक्कर गुहा मंदिरात, जे आता शेजारच्या तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी जिल्ह्यात आहे, येथे मिळते.
केरळमधील सर्वात मोठे भित्तिचित्र – गजेंद्रमोक्ष – हे अलप्पुझ जिल्ह्यातील कायमकुलम जवळील कृष्णपुरम महालात सापडते. एर्नाकुलम जिल्ह्यातील मत्तनचेरी महालात रामायण आणि भागवतातील अनेक दृश्ये दाखविणारी मोठी भित्तिचित्रे जतन केली आहेत. एट्टुमनूर मधील शिवमंदिरातील भित्तिचित्रांमधून प्राचीन द्रविड चित्रांची झलक पहायला मिळते.
हे येथे उपलब्ध आहे – कल्चरल शॉपी दुकान, मॅस्कॉट हॉटेल, थिरुवनंतपुरम - 695 033, केरळ. ईमेल: info@cultureshoppe.com,
www.cultureshoppe.com. या कल्चरल शॉपी केरळ सरकारच्या पर्यटन विभागाच्या केरळ स्मृतिचिन्हांचा प्रसार करणाऱ्या अधिकृत एजन्सी आहेत.