नेट्टूरपट्टी, म्हणजे केरळी स्त्रियांची पारंपरिक दागिन्यांची पेटी ही एकेकाळी येथील श्रीमंत कुटुंबांचे निपर्यटक चिन्ह होते. मलाबारच्या नेट्टूर प्रांतात पूर्वी बनविल्या जाणाऱ्या या डब्या, बनविणाऱ्या कारागिराचा संयम आणि कौशल्य यांच्या निपर्यटक असतात. शिसवी लाकडापासून बनणाऱ्या या पेट्या पूर्णपणे हाताने बनवलेल्या असतात. प्रत्येक सांधा, प्रत्येक स्क्रू आणि कुलुप हातानेच बनवले जाते. लाकडी पेटीला आधी वार्निश लावले जाते आणि नंतर पितळी चौकटी बसवल्या जातात. आज, सुंदर सजवलेली, शंकूच्या आकाराचे झाकण असलेली पेटी संग्राहकांसाठी आकर्षक वस्तू आहे. हे बनवणारे कारागीत फार कमी प्रमाणात आहेत आणि ही पेटी एक दुर्मिळ वस्तू होत आहे.
ही येथे उपलब्ध आहे – कल्चरल शॉपी दुकान, मॅस्कॉट हॉटेल, थिरुवनंतपुरम - 695 033, केरळ. ईमेल: info@cultureshoppe.com,
www.cultureshoppe.com. या कल्चरल शॉपी केरळ सरकारच्या पर्यटन विभागाच्या केरळ स्मृतिचिन्हांचा प्रसार करणाऱ्या अधिकृत एजन्सी आहेत.