केरळमध्ये, मिरी मिश्रपिकांच्या पद्धतीने वाढवली जाते. मिरी कॉफीच्या झाडांमध्ये लावली जाते आणि ती मोठ्या प्रमाणावर लावली जाते. केरळच्या अनेक घरगुती बागांमध्येही मिरीचे रोप असते.
मसाल्यांनी सुगंधित केरळचे किनारे व्यापाऱ्यांना आदिम काळापासून आकर्षित करत आले आहेत आणि त्यांचे आकर्षण आजही आहे. राज्यातील व्यापारात मसाल्याच्या व्यापाराचा वाटा आजही मोठा आहे. जगातील मसाल्यांचा सर्वात मोठा निर्यातदार असलेला भारत आपल्या निर्यातीतील तीन चतुर्थांश भाग केरळच्या समृद्ध लागवडीतून घेतो.
बॅबिलोन आणि इजिप्तसह केरळच्या मसाल्यांचा व्यापार ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकापासून चालत आला आहे आणि तेथे फरोंच्या मृत शरींरांना लेपण्यासाठी आणि सुगंध आणि पवित्र तेले बनविण्यासाठी यांचा उपयोग होत असे. इस्राएलचा राजा सोलोमन (ख्रिस्तपूर्व1000) याने केरळला मसाले आयात करण्यासाठी जहाजे पाठवली होती. केरळची दालचिनी अरबांद्वारे मध्यपूर्वेत पोहोचली.
Department of Tourism, Government of Kerala, Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.
Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org