 |
 |
|
 |
 |
 |
|
 |
 |
|
| पुल्पाया |
|
 |

तलम, शीतल, लाल व काळ्या रंगात विणलेल्या, पारंपरिक पुल्पाया अथवा केरळच्या गवती चटया या राज्याच्या हाताने विणायच्या अतिशय जुन्या वस्तूंच्या उत्पादनांपैकी एक वस्तू आहे. या चटयांचा उल्लेख अथर्व वेदात( इ.स.पू.3500 – 1500) चार पैकी एका वेदामधे(प्राचीन भारतीय तात्विक ग्रंथ) देखील सापडतो. यांच्या आकारानुसार त्या बसण्यासाठी अथवा झोपण्यासाठी देखील वापरल्या जात. या चटयांचा वापर काही विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीच करत, व सामान्य माणसे लाकडी फळ्यांचा वापर करत.
या चटया 91.5 to 152 सेमी. उंचीच्या पापायरस कुलातील कोरापल्लू(सायप्रस कोरेम्बुसेस) नावाच्या गवतापासून विणल्या जातात. या चटया अनेक रंगात विणल्या जातात. कोरापल्लू गवत ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान पूर्ण वाढून अधिकाधिक उंच होते. ग्रामीण लोक ते गवत मोठ्या प्रमाणावर एकत्र करून त्याच्या अतिशय बारीक व लांब पट्ट्या कापतात.मग त्या तीन दिवस उन्हामधे सुकवल्या जातात. त्यानंतर चपांगम(कसाल्पेनिया सॅपम) नावाच्या झाडाची साल असलेल्या पाण्यात या पट्ट्या उकळवून त्या डाय केल्या जातात. सामान्यत: 183 सेमी लांब व 91.5 सेमी रुंद पुल्पाया विणण्यासाठी एका विणकराला एक पूर्ण दिवस लागतो.
पुल्पाया ही बसण्यासाठी वापरली जाणारी एक अतिशय शीतल वस्तू असून आजही उन्हाळ्याच्या दिवसात राज्यभर ती बसण्यासाठी वापरली जाते. हा गवतापासून पिशव्या, टेबल-मॅट्स, वॉल-हॅंगिंग्ज इ. अन्य वस्तूदेखील विणल्या जातात. हा पालक्कड व त्रिसूर जिल्ह्यातील प्रचलित व्यवसाय आहे. या चटया व अन्य वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधे खूप मागणी आहे. तसेच त्या कॅनडा, जर्मनी, यू.एस. यू.के. इटली, न्यूझिलंड इ. देशांमधे अनेक दशके निर्यात केल्या जातात.
पुल्पाया ला अन्य भारतातही, विशेषत: मुंबई, दिल्ली, कोलकाता चेन्नई इ. ठिकाणांहून खूप मागणी आहे..
तुलनेने स्वस्त असलेल्या या एका चटईची किंमत तिचा आकार, पोत, व नक्षीनुसार 45/- ते 800/- पर्यंत असू शकते.
|
|
|
| |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| |
|
|