केरळमधील समृद्ध चित्रकला परंपरा येथील अनुष्ठानांमधून जसे की कलामेजुथू (जमिनीवर केलेली चित्रलिपी पेंटिंग) आणि येथील प्राचीन देवळांत तसेच चर्चमध्ये दिसून येणारे फ़्रेस्को किंवा भित्तिचित्रांशी संबंधित आहे. कागद आणि शाईच्या वापरापूर्वी ताडपत्री तसेच वनस्पतींचे डाय (रंग) वापरले जात असत. आधुनिक केरळने राजा रविवर्म्याच्या चित्रांमार्फ़त एक आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण केली आहे.
त्रावणकोरच्या किलिमनूर महालामध्ये राजकुमार रविवर्म्याने (१८४८-१९०६) आपल्या कला क्षमतेला प्रारंभिक अवस्थेमध्येच विकसित केले होते. त्यांनी थियोडोर जॉनसन नावाच्या एका इंग्रजी चित्रकाराकडून ऑईल पेंटिंग बनविण्याची प्रक्रिया शिकून घेतली. थियोडोर त्यावेळी त्यांच्या महालात राहत असे.
रविवर्म्याच्या चित्रांमधून मानवी गुण तसेच निसर्गातील सूक्ष्म भावना असेच औदात्य मोठ्या यथार्थपणे उमटवले गेले.
रविवर्म्याची विशेष चित्रे श्री चित्रा आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शित केली गेली आहेत. ही गॅलरी तिरुवनंतपुरम शहराच्या नेपियर म्युझियम कंपाऊंडमध्ये स्थित आहे. सोमवार सोडून इतर दिवशी ही सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उघडी असते. ह्या गॅलरीमध्ये चित्रकार रोरिख ची चित्रेदेखील ठेवली गेली आहेत. त्याचबरोबर आपल्याला येथे मुगल, राजपूत आणि तंजावर शैलीची कला, अजंठा तसेच बाघमधील गुंफ़ांची चित्रे, चीन, जपान, तिबेट तसेच बाली सारख्या देशांच्या कलांचा संग्रह देखील दिसून येतो.
आज केरळमध्ये दोन संस्थाने आहेत जिथे चित्रकलेला एक विषय म्हणून शिकवले जाते. ती आहेत- कॉलेज ऑफ़ फ़ाइन आर्टस,तिरूवनंतपुरम तसेच रवि वर्मा कॉलेज ऑफ़ फ़ाइन आर्टस (सरकारी), मावेलिक्कारा, अलप्पुझा जिल्हा. रवि वर्मा कॉलेज ऑफ़ फ़ाइन आर्ट्सची स्थापना त्यांचा पुत्र रामवर्मा याने केली.
Department of Tourism, Government of Kerala, Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.
Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org