चंदनाचे तेल, जे ‘द्रवरूप सोने’ म्हणूनही ओळखले जाते, कित्येक वर्षांपासून ह्या भूमीतले प्रसिद्ध सुवासिक अत्तर आहे. चंदनाच्या वृक्षाच्या मूळांपासून आणि लाकडापासून (सॅंटलम ऐल्बम) काढले जाणारे हे तेल महाग असून राज्यातल्या निवडक दुकानांमध्येच विकले जाते.
शेजारी राज्ये जसे तामिळनाडू आणि कर्नाटकच्या (विशेषत: म्हैसूरची जंगले) तुलनेत केरळमध्ये चंदनाची जंगले कमी आहेत. केरळमध्ये कोट्ट्यम शहरापासून 149 किमीवर असलेले प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण देवीकुलम जवळच्या मरयुर इथे चंदनाची जंगले आहेत आणि काही वयनाड डोंगरांमध्ये आहेत.
मरयूर हे केरळमधील एकमेव ठिकाण आहे, जिथे नैसर्गिक चंदनाची जंगले आहेत. वन विभागामार्फत चालविल्या जाणार्या चंदनाच्या कारखान्याला पर्यटक भेट देतात. उत्कृष्ठ चंदनाच्या वृक्षांच्या वाढीसाठी कमी पाऊस लागतो ज्यापासून चांगल्या दर्जाचे तेल काढता येऊ शकते.
उच्चभ्रू लोकांसाठी एक अनिवार्य सौंदर्यप्रसाधन असल्याकारणाने, कर्नाटक सरकारकडून घेतलेल्या चंदनाच्या तेलाला केरळमध्ये कित्येक वर्षांपासून चांगली बाजारपेठ मिळाली आहे. केरळमधील बर्याचशा सरकारी हस्तकला एम्पोरिअममध्ये हे विक्रीकरिता उपलब्ध असते. असेच एक आहे थिरुवनंतपुरम् मधील एसएमएसएम संस्था. काही खाजगी एजन्सींनी बनविलेले चंदनाचे तेलही सरकारी संशोधन सेलने गुणवत्तेची तपासाणी केल्यावर येथे विकले जाते.
Department of Tourism, Government of Kerala, Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.
Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org