 |
 |
|
 |
 |
 |
|
 |
 |
|
| सी फ़ूड |
|
 |

केरळमधील सी फ़ूड आतिशय प्रसिद्ध आहे आणि झिंगा,कटलफ़िश, स्क्विड मासा आणि इतर काही माशांना वैश्विक बाजारपेठेत भरपूर मागणी आहे. याभूमीत समृद्ध असे किनार्यालगतचे फ़िशिंग क्षेत्र उपलब्ध आसल्याने येथे ऑइल सार्डिन (माथी चाल), मैकरेल (आइला), प्रॉन्स (चेम्मीन), सिल्वर बेलीज (मुल्लंस) आणि यांसारख्या व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा माशांचे उत्पादन केले जाते.
केरळमध्ये साधारणतः 36,000 वर्ग किमी. सामुद्रिक जल आणि 3600 वर्ग किमी. क्षेत्रात अंतर्गत (इनलॅन्ड) पाणी उपलब्ध आहे.अंतर्गत जलस्रोतांमध्ये 44 नद्या, झरे, तळी, कालवे, अप्रवाही जल आणि फ़िश फ़ार्मस्चा समावेश होतो.यामुळे केरळ हे देशातील सर्वात जास्त मासे उत्पादन करणारे राज्य आहे. या राज्याची समुद्रिक संसाधनांच्या उत्पादनाची क्षमता सर्वाधिक जास्त आहे आणि ती वर्षाला 10 लाख टन इतकी आहे.
दक्षिण पूर्व एशिया, पश्चिमी युरोप,जपान आणि यु.एस.ए.याठिकाणांहून केरळच्या डबाबंद सी फ़ूडला भरपूर मागणी आहे. कित्येक वर्षांपासून केरळमधील सी फ़ूडचा उपभोग घेणारा देश म्हणून जपानचे नाव घेतले जाते.
राज्यातील तिसरे मोठे मत्स्य उत्पादन केंद्र आहे कोल्लम, खासकरून नींदकारा; जे अरबी समुद्रकिनार्यावरील एक प्राचीन बंदर आहे.कोल्लममध्ये 24 इनलॅन्ड फ़िशिंग गावे आहेत. जर आपण केरळच्या मध्य भागाकडे वळलो तर अलप्पुझा देखील मत्स्य उत्पादनामध्ये मोलाचे योगदान देते. अलप्पुझाला सर्वसाधारणपणे पूर्वेकडील व्हेनिस म्हटले जाते. अरबी समुद्राची राणी अर्थात कोच्चि ही सी फ़ूड निर्यात करणार्या कंपन्यांचे एक प्रमुख केंन्द्र आहे.
80 किमी लांब समुद्रकिनारा असणार्या कासारगोडमध्ये मासे पकडण्याची कित्येक केंन्द्रे उपलब्ध आहेत. उत्तर केरळमधील कन्नूर जिल्ह्यालासुद्धा ८२ किमी लांब समुद्रकिनारा उपलब्ध आहे, जे फ़िशिंग उद्योगातील एक मोठे उत्पादन केंन्द्र आहे.
|
|
|
| |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| |
|
|