उरू किंवा धो ही पारंपरिक अरबी व्यापारी होडी आहे. अरबी व्यापाऱ्यांना श्रीमंत केरळ, तेथील मजबूत लाकूड, कुशल कारागिर आणि तेथील स्थानिक प्राचीन तंत्रज्ञान या सर्वांचे आकर्षण वाटले आणि त्यांनी आपले धो-बांधणी ठिकाण मलाबारला (उत्तर केरळ) हलवले.
कोझिकोड जिल्ह्यातील बेपूर, हे या प्रांतातील सर्वात महत्त्वाचे बंदर आहे आणि म्हणून जहाज बांधणीचे केंद्र आहे. बांधणीसाठी लोखंड आणि पोलादाचा वापर सुरू होईपर्यंत आत्ता आता पर्यंत हा उद्योग भरभराटीत चालला होता.
उरू म्हणजे भव्य होड्या, ज्या भव्य लाकडी फळ्या एकत्र जोडून बनवल्या जातात. एक भव्य होडी बनविण्यासाठी पन्नास माणसांच्या गटाला कमीतकमी चार वर्षे लागतात.
आज, बेपूरमधून फारशा होड्या बनत नाहीत, आणि कारागीर भव्य जहाजांऐवजी त्यांचे लहान लाकडी नमुने बनवतात. तीन ते पाच फूट उंचीच्या या होड्यांच्या नमुन्यांची किंमत रु.450/- ते रु. 2500/- एवढी असते.
हे येथे उपलब्ध आहे – कल्चरल शॉपी दुकान, मॅस्कॉट हॉटेल, थिरुवनंतपुरम - 695 033, केरळ. ईमेल: info@cultureshoppe.com,
www.cultureshoppe.com. या कल्चरल शॉपी केरळ सरकारच्या पर्यटन विभागाच्या केरळ स्मृतिचिन्हांचा प्रसार करणाऱ्या अधिकृत एजन्सी आहेत.