मल्याळी (केरळी) व्यक्तीच्या जीवनातील सर्व उत्सव आणि विधींमध्ये, नीलविलाक्कु हा महत्त्वाचा भाग असतो. केरळमधील हिंदू उत्सवांचा अनिवार्य भाग असलेली नीलविलाक्कु सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही महत्त्वपूर्ण असते.
दिवेलागणी होते आणि हिंदू कुंटुंबातील तरुणी घराच्या वरांड्यात तेवणारी समईए (नीलविलाक्कु) आणून ठेवते. नीलविलाक्कुच्या मिणमिणत्या प्रकाशात तिच्यासह मुले आणि वडीलधारे, विशेषतः आजीआजोबा एकत्र येतात आणि मंत्र आणि दिवेलागणीची स्तोत्रे म्हणतात.
केरळमध्ये एखाद्या प्रसंगाची मंगल सुरुवात आणि यश यासाठी नीलविलाक्कु लावणे शुभ मानतात. वेगवेगळ्या कलांच्या सादरीकरणात भव्य नीलविलाक्कु लावून रात्रीच्या वेळी या पारंपरिक दिव्यांच्या प्रकाशात कलेचे सादरीकरण केले जाते.
हे येथे उपलब्ध आहे – कल्चरल शॉपी दुकान, मॅस्कॉट हॉटेल, थिरुवनंतपुरम - 695 033, केरळ. ईमेल: info@cultureshoppe.com,
www.cultureshoppe.com. या कल्चरल शॉपी केरळ सरकारच्या पर्यटन विभागाच्या केरळ स्मृतिचिन्हांचा प्रसार करणाऱ्या अधिकृत एजन्सी आहेत.