दि इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स पेटींग कॉम्पिटीशन 2018
इन मेमरी ऑफ क्लिंट
Picture of Edmund Thomas Clint

एडमंड थॉमस क्लिंट


एडमंड थॉमस क्लिंट हा श्री. एम. टी. जोसेफ आणि चिन्नमा जोसेफ या कोची, केरळमधीलदांपत्याचा एकुलता मुलगा होता. मूत्रपिंडाच्या दीर्घ आजारामुळे त्याला केवळ 2522 दिवसांचं आयुष्य लाभलं. पण अगदी बालवयापासूनच त्यानं रेखाटन आणि चित्रकलेमधील अपवादात्मक कौशल्यं दाखवायला सुरुवात केली.

क्लिंट प्रत्येक माध्यमाचा वापर केलाः खडू, क्रेयॉन्स, ऑईल पेंट्स आणि जल रंग आणि अशी रेखाटनं आणि चित्रं काढली ज्यामध्ये त्यानं पाहिलेल्या विश्वाचं प्रतिबिंब पडलं होतं. त्याचं कलेक्शन पाहून कलाप्रेमी आणि समीक्षक चकित झाले, त्याची परिपक्वता पाहून ते स्तंभित झाले आणि त्याच्या कलात्मक बुद्धिमत्तेची त्यांना खात्री पटली.

क्लिंट वयाचा सातवा वाढदिवस साजरा करण्यापूर्वी एक महिना आधीच हे जग सोडून गेला पण आपल्यामागे त्यानं कलाकृतींचा एक खजिनाच ठेवून दिला. लोकांच्या भावना जाणून घेण्याची अनोखी क्षमता त्याच्याकडे होती, आणि या शक्तिशाली भावनांमधून त्यानं प्रेरणा घेतली. वयानं लहान असूनही, क्लिंट अशा कलेची निर्मिती केली जिच्यामध्ये मृत्यु, एकांत, आणि प्रेम यासारख्या आशयघन संकल्पना प्रदर्शित केल्या. एक कलाकार असण्याखेरीज, क्लिंटला वाचनाचं अतिशय वेड होतं. महाभारत आणि रामायण ही महाकाव्यं त्याला आवडायची आणि रॉबिन्सन क्रुसोसारख्या साहसी कथा ऐकायला त्याला आवडायचं. या कथांमध्ये वर्णन केलेला प्रत्येक तपशील तो मनात साठवायचा आणि नंतर आपल्या कलेद्वारे ते व्यक्त करायचा.

Girls picking flowers
Kathakali
Raavanan
Pooram
Snake Boat
Theyyam
Sunset
Kavadi Festival
Village Temple Festival

क्लिंटचे वडील, हॉलिवुड कलाकार, क्लिंट इस्टवुडचे, निस्सीम चाहते होते, आणि आपल्या मुलाला त्यांनी क्लिंट हेच नाव दिलं. क्लिंटचं निधन झाल्यानंतर, नामवंत भारतीय माहितीपट निर्माते शीवकुमार यांनी या बाल कलाकाराचं जीवन आणि कार्य यांच्यावर एक माहितीपट तयार केला. हा माहितीपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवला गेला आणि क्लिंट इस्टवुड यांनी ब्राझीलमध्ये तो पाहिला. क्लिंटची कहाणी ऐकल्यावर इस्टवुड इतके भारावून गेले की त्यांनी क्लिंटच्या पालकांना एक सांत्वनपर संदेश पाठवला आणि त्यांच्या मुलाच्या अकाली निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं.