दि इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स पेटींग कॉम्पिटीशन 2018
इन मेमरी ऑफ क्लिंट
Picture of Edmund Thomas Clint

वारंवार विचारले जाणारे प्रश्न


4 आणि 16 वर्षे दरम्यान वय असलेले कोणतेही मूल (01.09.2002 रोजी/नंतर आणि 01.09.2014 रोजी/पूर्व जन्मलेले) जगातील कोणत्याही भागातून या स्पर्धेत सहभागी होऊ शकेल.
तुम्ही स्वतः एक प्रवर्तक म्हणून नोंदणी करु शकता, या स्पर्धेत सहभागी होणारे कोणतेही मूल आपल्या शिफारशीच्या आधारे आपल्या क्रेडिटमध्ये समाविष्ट केले जाईल आणि अधिकतम प्रवेशांना आधार देणाऱ्या प्रवर्तकांना देखील केरळ भेटीसाठी सहलीचे काँप्लिमेंटरी पॅकेजेस मिळू शकतात.
वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली कोणीही व्यक्ती या स्पर्धेसाठी एक प्रवर्तक म्हणून नोंदणी करु शकेल. ही कृती ऐच्छिक आहे, आणि प्रवर्तकांना कोणत्याही स्वरुपाचे मानधन दिले जाणार नाही.
नाही, या स्पर्धेतील प्रवेश मोफत आहे!
सहभागीने क्रेयॉन्स, रंगीत पेन्सिल्स किंवा रंग आणि ब्रश किंवा स्केच पेन्स वापरुन कागदावर हाताने एक चित्र काढणे अपेक्षित आहे. डिजिटल, इलेक्ट्रॉनिक किंवा यांत्रिक साधनं वापरुन काढलेले चित्र या स्पर्धेसाठी स्विकारले जाणार नाही. नंतर ते चित्र कोणत्याही पद्धतीने डिजिटल स्वरुपात रुपांतरित करावे आणि केरळ टुरिझम स्पर्धा पेजवर अपलोड करावे (फाईलचा आकार 5MB हून अधिक नसावा)
इच्छुक केवळ एकदाच नोंदणी करु शकतो परंतु तो/ती इच्छुक असल्यास कमाल पाच प्रवेशिका पाठवू शकतो.
स्पर्धेसाठी संकल्पना केरळ ही आहे! चित्र हे केरळशी संबंधित कोणत्याही विषयावर असू शकते. तुमच्या संदर्भासाठी, आम्ही सुंदर चित्रं आणि विडीयोजद्वारे विडीयो आणि फोटो ब्रोशर्स तयार केली आहेत. तुम्हाला हवे ते सर्वकाही इथे मिळेल.